गर्दीने वेढलेल्या मोठ-मोठ्या दाटीवाटीच्या शहरांमध्ये नारळ सुपारीची झाडं पाहायला मिळणं म्हणजे तसं दुर्मिळच. पण मिरा भाईंदर शहर आणि इथलं आरक्षण 256 उद्यान मात्र याला अपवाद आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे आरक्षण 256 उद्यानात नारळी सुपारीच्या गर्द हिरव्यागार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे आपल्याला एक आल्हाददायक निसर्गसफारीचा अनुभव देतात. इथल्या परिसराची भटकंती करताना क्षणभर आपल्याला अगदी कोकणात आल्यासारखे गर्दीने वेढलेल्या मोठ-मोठ्या दाटीवाटीच्या शहरांमध्ये नारळ सुपारीची झाडं पाहायला मिळणं म्हणजे तसं दुर्मिळच. पण मिरा भाईंदर शहर आणि इथलं आरक्षण 256 उद्यान मात्र याला अपवाद आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे आरक्षण 256 उद्यानात नारळी सुपारीच्या गर्द हिरव्यागार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे आपल्याला एक आल्हाददायक निसर्गसफारीचा अनुभव देतात. इथल्या परिसराची भटकंती करताना क्षणभर आपल्याला अगदी कोकणात आल्यासारखे वाटते. इथे आल्यावर मीरा भाईंदर महानगरपालिका या उद्यानाच्या स्वच्छतेची व इथल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असल्याचं तुमच्या निदर्शनास येईल. या उद्यानाची आणखी एक खासियत म्हणजे फिटनेस प्रेमींसाठी उभारण्यात आलेलं सुसज्ज असं ओपन जिम. मीरा भाईंदर मधील अनेक तरुण-तरुणींच्या दिवसाची सुरुवात इथल्या ओपन जिममध्ये व्यायाम करून होते. शिवाय इथे असलेले आरामदायी बेंचेस म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. या उद्यानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रांनी सजवण्यात आलेल्या उद्यानाच्या सुंदर भिंती. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाचा व एकात्मतेचा संदेश देणाऱ्या आकर्षक भित्तीचित्रांनी या उद्यानाच्या भिंती सुशोभित केल्या आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या उद्यानाला भेट दिलेल्या प्रत्येकालाच या उद्यानात पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. मग, तुमचं काय ठरलंय ? कधी येताय इथल्या ओपन जिम मध्ये व्यायामाने स्वस्थ जीवनाची सुरुवात करायला आणि निसर्गसौंदर्याने बहरलेल्या आणि सोईसुविधांनी सजलेल्या आरक्षण 256 उद्यानाची सफर करायला!