शहर औद्योगिक दृष्ट्या किंवा तांत्रिक दृष्ट्या कितीही प्रगत असले तरी शहराला खरे सौंदर्य प्राप्त होते ते तिथल्या निसर्गामुळे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभलेल्या मीरा-भाईंदर शहराच्या नैसर्गिक वैभवाला इथल्या उद्यानांमुळे एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. मीरा भाईंदर मधील प्रसिद्ध उद्यानांमधील एक उद्यान म्हणजे आरक्षण 273 उद्यान. उद्यान चहूबाजूंनी विविध वृक्षांनी आणि हिरवळीने सजलेले आहे. इथल्या वनस्पती आकर्षक व मनमोहक आहेत. उद्यानातील वनस्पती वैविध्य आपल्या मनाला भुरळ पाडते. इथे फक्त निसर्गसौंदर्यच आहे असं नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येकाच मन रमावं यासाठी महानगरपालिकेने येथे विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे अनेक मजेशीर उपकरणे आहेत. तरुणांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी खुली व्यायाम शाळा आणि सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक येथे आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी आरामदायी बेंचेस आहेत. इथल्या वृक्षांच्या सान्निध्यात आपला वेळ कसा जातो ते आपल्यालाच कळत नाही. अशा या निसर्ग रम्या उद्यानाला दररोज 2000हून अधिक नागरिक आवर्जून भेट देतात. तुम्ही जर तुमचं मन रमवण्यासाठी एक निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर आरक्षण 273 तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम पर्याय असू शकतो. मग कधी येताय या उद्यानाचा आनंद घ्यायला?