समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेली मीरा-भाईंदरची पावनभूमी संस्कृती आणि निसर्गसौंदर्याने किती संपन्न आहे ही इथली उद्यानांची सफर केल्यावर आपल्याला जाणवते. चला तर आज फेरफटका मारू या मधील प्रसिद्ध आरक्षण 261 उद्यानाचा. या उद्यानात प्रवेश करताच उद्यानातील हिरवळ आणि गुलाबी रंगांनी सजलेली फुलझाडे आपलं मन प्रफुल्लित करतात. उद्यानातील वळणदार पायवाट आपल्या पायांना चालण्यासाठी नवा उत्साह देते. उद्यानातील परिसर विविध झाडाने भरलेला दिसतो. इथे भेट देणारा प्रत्येकालाच इथल्या वृक्षांच्या सानिध्यात तासनतास बसून राहावेसे वाटते. उद्यानातील झाडांवर येणारे विविध पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. इथला शांत व सुंदर परिसर आपल्या मनाला प्रसन्न करून जातो. उद्यानातील सोयीसुविधांनीबद्दल म्हणायचे झाल्यास इथे बालगोपाळांना खेळण्यासाठी गमतीदार साधने आहेत. नागरिकांच्या विश्रांतीसाठी आरामदायी बेंचेस आणि झोपाळे आहेत. मीरा भाईंदर मधील अनेक फिटनेस प्रेमींच्या दिवसाची सुरुवात या उद्यानातील ओपन जिममध्ये व्यायाम करून होते. बालगोपाळ असो तरुण मंडळी असो किंवा ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनाच या उद्यानाने भूरळ घातली आहे. उद्यानात फेरफटका मारल्यावर आपल्या लक्षात येते की उद्यानातील वृक्षांचे संगोपन आणि उद्यानाची स्वच्छता याची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे अगदी उत्तमरित्या पार पाडली जात आहे. मग तुम्ही काय ठरवलंय, कधी घेताय या आरक्षण 261 उद्यानाची भटकंती करायला!