संस्कृती आणि सोयीसुविधांनी सजलेल्या मीरा-भाईंदर शहराला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे हे आपल्याला इथल्या निसर्गरम्य उद्यानांची सफर केल्यावर जाणवते. मीरा-भाईंदर शहरात स्थापन करण्यात आलेल्या अनेक निसर्गरम्य उद्यानांपैकी एक उद्यान म्हणजेच आरक्षण 329 जॉन मेंडोसा उद्यान. या उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिकांचे मन आणि मूड दोन्ही अगदी फ्रेश होऊन जाईल अशा अनेक सोयी सुविधा या उद्यानात आहेत. इथली शांतता सुखावणारी आहे व इथे आल्यावर काही क्षण संस्कृती आणि सोयीसुविधांनी सजलेल्या मीरा-भाईंदर शहराला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे हे आपल्याला इथल्या निसर्गरम्य उद्यानांची सफर केल्यावर जाणवते. मीरा-भाईंदर शहरात स्थापन करण्यात आलेल्या अनेक निसर्गरम्य उद्यानांपैकी एक उद्यान म्हणजेच आरक्षण 329 जॉन मेंडोसा उद्यान. या उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिकांचे मन आणि मूड दोन्ही अगदी फ्रेश होऊन जाईल अशा अनेक सोयी सुविधा या उद्यानात आहेत. इथली शांतता सुखावणारी आहे व इथे आल्यावर काही क्षण तणावातून मुक्तता मिळते असे इथे भेट देणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.या उद्यानातील विविध प्रकारची आकर्षक झाडं आणि इथला स्वच्छ परिसर तुम्हाला एक आल्हाददायक अनुभव देतात. 4343 चौरस मीटर परिसरावर स्थापन करण्यात आलेल्या या उद्यानात विविध प्रकारच्या सुमारे हजार ते दीड हजार झाडांची लागवड करण्यात आली. हे उद्यान तर लहान मुलांचे विशेष पसंतीचे आहे. या उद्यानात येणारी लहान मुलं इथल्या गंमतीदार उपकरणा सोबत तासन् तास खेळत असतात. लहान मुलांसोबतच तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही या उद्यानाकडे विशेष ओढा आहे. अनेक तरुणांच्या दिवसाची सुरुवात इथल्या ओपन जिममधील व्यायामाने होते. शिवाय फिटनेस प्रेमींसाठी या उद्यानात जॉगिंग ट्रॅक व योगा करण्यासाठी योगा छतही इथे उपलब्ध आहे. उद्यानात ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी आरामदायी आसनांची व्यवस्थाही मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांशी या उद्यानात फेरफटका मारताना दिसतात. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सततच्या प्रयत्नांमुळे वर्षानुवर्षे या उद्यानाच्या सौंदर्यात भर पडत आली आहे. तुम्हालाही जर इथल्या मजा-मस्तीचे, निरव शांततेचे आणि निसर्गरम्य देखाव्याचे साक्षीदार व्हायचे असेल तर आजच या सुंदर उद्यानाला भेट द्या.